लाखो जोडप्यांना साधला ११/१२/१३ चा मुहूर्त

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, November 12, 2013 - 14:10

www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क
११/१२/१३ तारखेचा योग साधून जगभरात लाखो जोडपी विवाहबंधनात अडकण्यास उत्सुक आहेत. ही एक खास तारीख मानली जाते. त्यामुळे जगभरातील अनेक जोडप्यांना या दिवशी लग्न करण्याची इच्छा आहे. नुसत्या अमेरिकेत या दिवशी लग्न करण्यासाठी २,२६५ जोडप्यांनी नाव नोंदणी केली आहे.
११/१२/१३ या अद्भूत तारखेचा मुहुर्त साधता यावा, यासाठी अनेक महिन्यांपासून तयारी सुरू आहे. संख्याशास्त्रानुसार एका सिक्वेन्समध्ये येणारे अंक असणारी तारीख किंवा समान अंक असणारी तारीख सौभाग्य देणारी असते. ११/१२/१३ असा योग नेहमी येत नसतो. ज्यांचा यादिवशी जन्म झाला आहे, अशी बालकंही भाग्यवान मानली जातात.
न्यूयॉर्क डेली न्यूजच्या अहवालानुसार, आज २०१२ साली झालेल्या विवाहांपेक्षा ७२२ टक्के नफा झाला आहे. अंकज्योतिषानुसार अशा तारखा सौभाग्य देणाऱ्या असल्या, तरी ज्योतिषशास्त्रात अशा दिनांकांबद्दल कुठलंही मिथक जोडलेलं नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, November 12, 2013 - 13:32
comments powered by Disqus