भारत-पाक सीमेवर रात्रभर गोळीबार, दोन ठार

पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. 

Updated: Aug 23, 2014, 09:25 AM IST
भारत-पाक सीमेवर रात्रभर गोळीबार, दोन ठार title=

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. 

शनिवारी रात्री 12.50 पासून पाकिस्तान रेंजर्सनं गोळीबार केला. आरएस पुरा सेक्टरमध्ये झालेल्या या गोळीबारात दोन भारतीयांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झालेत. अकरम हुसैन आणि त्यांचा मुलगा असलम हे दोघे जण या गोळीबारात ठार झालेत. तर, जखमींना जम्मूच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलंय. 

पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं या परिसरात गोळीबार केला जातोय. ऑगस्ट महिन्यात आत्तापर्यंत 17 वेळा तर जानेवारी 2014 पासून आत्तापर्यंत 60 वेळा पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. या सततच्या गोळीबारामुळे सीमेलगतच्या गावात तणावाच वातावरण आहे.

भारतीय सैन्यानं या भागातील गावांना रिकामं केलंय. सर्व गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.  

भारत-पाक सीमेवर सुरुंग सापडला... 
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अखनूर सेक्टरमध्ये सुरक्षादलानं भारत-पाक सीमेवर सुरुंग सापडल्याचा खुलासा केलाय. सीमेवर घुसखोरी करण्यात अपयश आल्यानंतर पाकिस्तानकडून सुरुंग लावून घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 50 मीटर लांब या सुरुंगाची उंची जवळपास 8 ते 10 फूट तर रुंदी 2 ते 2.5 फूटांची आहे. यातून एखादी व्यक्ती आरामात आर-पार जाऊ शकते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.