बेपत्ता विमानाला हिंद महासागरात 'जलसमाधी'

मलेशिया एअरलाईन्सच्या बेपत्ता विमान एमएच 370ला अपघात झाल्याचं स्पष्ट होतं आहे. या विमानाची यात्रा हिंद महासागरात समाप्त झाली आहे.

Updated: Mar 24, 2014, 11:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मलेशिया एअरलाईन्सच्या बेपत्ता विमान एमएच 370ला अपघात झाल्याचं स्पष्ट होतं आहे. या विमानाची यात्रा हिंद महासागरात समाप्त झाली आहे.
तसेच विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असेल, असंही मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांनी स्पष्ट केलं आहे.
उपग्रहाच्या आधारावरून मिळालेल्या फोटोंवरून हा बाबतचे संकेत मिळत आहेत की, हे विमान एमएच370 हिंद महासागरात पडलंय. तसेच विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असेल, असंही सांगण्यात आलंय.
मलेशियाचे नजीब रजाक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानात चालक दलासह एकूण 239 प्रवासी होते.
मलेशिया एअरलाईन्सचं विमान एमएच 370, ८ मार्च रोजी उड्डाणानंतर काही तासांत बेपत्ता झालं होतं, हे विमान क्वालालांम्पूरहून बिजिंगला जात होतं.
मलेशियाच्या पंतप्रधानांनी ही घोषणा हिंद महासागराच्या दक्षिण भागात विमान शोधण्यासाठी सुरू असलेल्या पाच दिवसाच्या अभियानानंतर केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.