अजब...त्याने केले किंग कोब्रा सापाशी लग्न

लग्नाच्या अनेक बातम्या तुम्ही आतापर्यंत पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण आज आगळ्या वेगळ्या लग्नाची बातमी. ही बातमी आहे थायलंडमधली. एका युवकानं चक्क 9 फूट लांबीच्या किंग कोब्रा जातीच्या सापाशी लग्न केले आहे.

Reuters | Updated: Nov 13, 2016, 10:56 PM IST
अजब...त्याने केले किंग कोब्रा सापाशी लग्न title=

थायलंड : लग्नाच्या अनेक बातम्या तुम्ही आतापर्यंत पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण आज आगळ्या वेगळ्या लग्नाची बातमी. ही बातमी आहे थायलंडमधली. एका युवकानं चक्क 9 फूट लांबीच्या किंग कोब्रा जातीच्या सापाशी लग्न केले आहे.

वॉरन सारासलीन असं या युवकाचं नाव आहे. पाच वर्षांपूर्वी वॉरनची प्रेयसी एका दुर्घटनेत मृत्यू पावली. तिनं सापाच्या रुपात पुन्हा जन्म घेतला, अशी त्याची समजूत झाली आणि त्यातूनच त्यानं चक्क 9 फूट लांबीच्या विषारी किंग कोब्रा जातीच्या सापासोबत संसार थाटलाय.

वॉरेन आणि सापाची ही जोडी सतत एकमेकांसोबत असते. वॉरन आपल्या या नव्या जोडीदारासोबत कॅरम खेळतो, जीमला जातो, फिरायला जातो. इतकचं नाही तर चक्क सोबत झोपतोही.