विवाहित महिलेला लग्नासाठी हवीय मुलगी!

पाकिस्तानात एका विवाहित महिलेला लग्न करायचंय... आणि यावेळेस ती एका मुलीच्या शोधात आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय का? पण, हो हे खरं आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 7, 2013, 05:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
पाकिस्तानात एका विवाहित महिलेला लग्न करायचंय... आणि यावेळेस ती एका मुलीच्या शोधात आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय का? पण, हो हे खरं आहे.
ही विवाहित महिला आपलं जीवन मोठ्या आनंदात व्यतीत करतेय. परंतु, आता मात्र तिला एखाद्या मुलीशी लग्न करायची इच्छा आहे... याच कारण म्हणजे तीनं आपलं लिंग परिवर्तन करून घेतलंय. आता ही महिला पुरुष बनलीय.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात गाझियाबादमध्ये जन्मलेल्या या महिलेचा विवाह २०११ साली स्पेनमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाशी झाला होता. तिचा पती प्रत्येक सहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर तिला भेटण्यासाठी इथं येत होता. लग्नानंतर दोन वर्षांनीदेखील या महिलेला अपत्यप्राप्ती झाली नाही तेव्हा या महिलेनं स्त्रीरोग तज्ज्ञाची भेट घेतली.
तपासणीनंतर माहीत पडलं की या महिलेचं आपोआप लिंग परिवर्तन होतंय आणि ताबडतोब यावर शस्त्रक्रिया होणं गरजेचं आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ही महिला पुरुष बनलीय. ही गोष्ट पतीला समजल्यानंतर त्यानं तिच्याशी संबंध तोडले... आणि लग्नाच्या वेळेस घेतलेला हुंडाही पूर्ण सन्मानानं तिला परत धाडला.

यानंतर या पुरुष बनलेल्या महिलेनं एक दुकान सुरू केलं. परंतु आता तिला पुन्हा वैवाहिक जीवन जगण्याची इच्छा आहे. त्यामुळे आता ती एका मुलीच्या शोधात आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.