उडत्या विमानात आढळला जिवंत साप

उडत्या विमानात साप आढळल्याचा प्रकार मेक्सिकोत घडलाय. विमान हवेत असताना एक साप छतावर लटकलेला दिसला.

Updated: Nov 8, 2016, 02:28 PM IST
उडत्या विमानात आढळला जिवंत साप title=

मेक्सिको : उडत्या विमानात साप आढळल्याचा प्रकार मेक्सिकोत घडलाय. विमान हवेत असताना एक साप छतावर लटकलेला दिसला, हा साप दिसला तेव्हा प्रवाशांमध्ये घबराट पसरली. हा साप छतावरून खाली पडला आणि खाली चालायला लागता.

मात्र यानंतर या विमानाचं तात्काळ लँडिंग करण्यात आलं, आणि सापाला विमानाच्या बाहेर काढल्यानंतर पुन्हा विमानाने आकाशात झेप घेतली आणि प्रवाशांनीही सुटकेचा श्वास घेतला.