सोन्याहून ४० पट महाग उल्कापिंड

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, February 19, 2013 - 19:15

www.24taas.com, मॉस्को
मध्य रशियात शुक्रवारी पडलेल्या उल्का पिंडाचे तुकडे सोन्यापेक्षा ४० पट महाग आहे. शुक्रवारी पडलेल्या उल्कापिंडाचे ५० तुकडे सापडल्याचा दावा रशियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे. हे तुकडे रशियाच्या उराल पर्वत आणि चेलियाबिन्स्कच्या आसपास पडले होते.

एका तरुण वैज्ञानिकाने दिलेल्या माहितीनुसार उल्कापिंडाचे तुकडे बहुमूल्य असतात. या उल्कापिंडाच्या तुकड्याची किंमत २२०० डॉलर प्रति ग्रॅम आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार १ लाख २१ रुपये आहे. ही सोन्याच्या किंमतीपेक्षा ४० टक्के अधिक आहे. रशियाच्या विज्ञान अकादमीचे सदस्य विक्टर ग्रोशोस्की यांनी दिलेल्या बातमीनुसार आम्हांला चेबरकुल तलावात उल्कापिंडाचे ५० तुकडे सापडले आहेत.
अकादमीने या तुकड्यांचे रासायनिक परीक्षण केल्यानंतर हे अंतराळातून आल्याचे स्पष्ट झाले आहे. हे उल्कापिंड रेगुलर कॉन्ड्राइट्स श्रेणीतील आहे. यात लोह, क्राइसोलाइट आणि सल्फाइटचे अंश सापडले आहे.

First Published: Tuesday, February 19, 2013 - 19:15
comments powered by Disqus