दिवाळीत मिशेल ओबामांचा बॉलिवूड डान्स

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, November 7, 2013 - 12:20

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
यंदा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांच्या पुढाकाराने व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी जल्लोषात साजरी झाली. या वेळी मिशेल ओबामा यांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्यही केलं.
नृत्यापूर्वी मिशेल यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळी म्हणजे नेमकं काय? याबद्दलही मिशेल यांनी माहिती दिली. भारतीय परंपरेबद्दल लहानसं भाषणही केलं. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाने मिळवलेला विजय असून वाईटावर चांगल्याचा विजय असा त्याचा अर्थ असल्याचं मिशेल ओबामांनी म्हटलं. यावेळई भारतीय पंडितांकडून मंत्रोच्चारही करण्यात आले. याचसोबत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीनिमित्त बॉलिवूडची गाणी लावण्यात आली. यावेळी मिशेल ओबामांनी हिंदी गाण्यांवर डान्स केला.
तीन वर्षांपूर्वी ओबामा दाम्पत्य भारतात आलं होतं. त्यावेळी मुंबईत मिशेल ओबामांनी कोळीगीतांवर नृत्य केलं होतं. दिवाळीतही मिशेल यांनी व्हाईट हाऊसच्या ईस्ट रूममध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भारतीय वंशाच्या अमेरिकन चिमुकल्यांसोबत मिशेल यांनी नृत्य केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, November 7, 2013 - 12:20
comments powered by Disqus