'मिस वर्ल्ड' स्पर्धेतून 'बिकिनी राऊंड' आऊट!

 'मिस वर्ल्ड' स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या 'मिस वर्ल्ड लिमिटेड'नं यापुढे या स्पर्धेत 'स्विमसूट राऊंड' होणार नाही असं जाहीर केलंय. महिलांची सुंदरता पाहण्यासाठी त्यांना बिकिनीमध्ये चालताना पाहणं आपल्याला गरजेचं वाटत नसल्याचं सांगत, या संघटनेच्या अध्यक्ष ज्युलिया मोर्ले यांनी यापुढे हा राऊंड बंद करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. 

Updated: Dec 21, 2014, 10:49 AM IST
'मिस वर्ल्ड' स्पर्धेतून 'बिकिनी राऊंड' आऊट! title=

लंडन :  'मिस वर्ल्ड' स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या 'मिस वर्ल्ड लिमिटेड'नं यापुढे या स्पर्धेत 'स्विमसूट राऊंड' होणार नाही असं जाहीर केलंय. महिलांची सुंदरता पाहण्यासाठी त्यांना बिकिनीमध्ये चालताना पाहणं आपल्याला गरजेचं वाटत नसल्याचं सांगत, या संघटनेच्या अध्यक्ष ज्युलिया मोर्ले यांनी यापुढे हा राऊंड बंद करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. 

या राऊंडशी महिलांचं काहीही देणं-घेणं नाही आणि ना आमचं... कुणाचा पार्श्वभाग दुसरीपेक्षा दोन इंचानं मोठा आहे किंव नाही... यामुळे आम्हाला या  काहीही फरक पडत नाही... आम्हाला केवळ ती महिला काय बोलतेय हे ऐकायचंय' असं स्पष्ट शब्दांत मोर्ले यांनी म्हटलंय. 

लंडनमध्ये १४ डिसेंबर रोजी आयोजित झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत साऊथ आफ्रिकेच्या रोलेन स्ट्रॉस हिला मिस वर्ल्ड म्हणून निवडण्यात आलंय. स्पर्धेच्या शेवटच्या राऊंडमध्ये सर्वच स्पर्धक महिला बिकिनीमध्ये दिसल्या होत्या... आता, संघटनेच्या या निर्णयामुळे पुढच्या वर्षी स्पर्धेत बिकिनीमध्ये दिसणार नाहीत. 


१९५१ सालची मिस वर्ल्ड स्पर्धा

कशी सुरू झाली होती ही स्पर्धा...
बिकिनीच्या जाहिरातीसाठी काही दशकांपूर्वी सुरु झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत हा राऊंड सुरू करण्यात आला होता. ज्युलियाचा पती एरिक यानं १९५१ मध्ये एका 'स्विमिंग सूट'च्या जाहिरातीसाठी या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यानंतर 'मीडिया हाईप'मुळे या स्पर्धेच्या विजेत्या महिलेला 'मिस वर्ल्ड'चं नाव दिलं गेलं. १९५१ मध्ये पहिल्यांदा आणि शेवटी विजेत्या महिलेनं बिकिनी परिधान करून या स्पर्धेचा मुकूट परिधान केला होता.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.