अफगाणिस्तानमध्ये मोठे भूस्खलन, 350 ठार

अफगाणिस्तानच्या ईशान्य भागात हाहाकार उडाला आहे. जोरदार पाऊस आणि डोंगर खचण्याचा प्रकार मोठ्याप्रमाणात झाल्याने शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्यात अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 350 नागरिक ठार झाले असून, दोन हजारांहून अधिक जण बेपत्ता आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासन, संयुक्त राष्ट्र आणि नाटो सैन्याच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 3, 2014, 02:54 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, काबूल
अफगाणिस्तानच्या ईशान्य भागात हाहाकार उडाला आहे. जोरदार पाऊस आणि डोंगर खचण्याचा प्रकार मोठ्याप्रमाणात झाल्याने शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्यात अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 350 नागरिक ठार झाले असून, दोन हजारांहून अधिक जण बेपत्ता आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासन, संयुक्त राष्ट्र आणि नाटो सैन्याच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.
अफगाणिस्तानमधील बदख्शां प्रांतातील होबो बरीक या गावात भूस्खलन झाले आहे. गावातील तब्बल दोन हजार जण बेपत्ता असल्याचे तेथील स्थानिक प्रशासनाने दिली आहे. गावातील जवळपास 300 घरे या भूस्खलनात उद्ध्वस्त झाली असावीत असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच डोंगर आणि जमीन खचल्याने अनेक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर गेल्या आठवड्यांत पुरामध्ये दीडशे नागरिकांचा मृत्यू झाला होता.