मंगोलियात सापडली २०० वर्षांपूर्वीची बौद्ध भिख्खूची 'ममी'!

मंगोलियात एका बौद्ध भिख्खूची 'ममी' आढळून आलीय. महत्त्वाचं म्हणजे, ध्यानधारणेला बसलेल्या या बौद्ध भिख्खूची ममी अजूनही 'लोटस' स्थितीत दिसतेय.

Updated: Jan 28, 2015, 09:46 PM IST


'लोटस' स्थितीतली ममी

नवी दिल्ली : मंगोलियात एका बौद्ध भिख्खूची 'ममी' आढळून आलीय. महत्त्वाचं म्हणजे, ध्यानधारणेला बसलेल्या या बौद्ध भिख्खूची ममी अजूनही 'लोटस' स्थितीत दिसतेय.

फॉरेन्सिक विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ही ममी सुमारे २०० वर्षांपूर्वीची असावी... या बौद्ध भिख्खूचं शरीर याच अवस्थेत प्राण्यांच्या कातड्यात गुंडाळून ठेवण्यात आलं असावं, असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. 

'द सायबेरियन टाईम्स'च्या म्हणण्यानुसार, लोटस स्थितीत मन:शांतिसाठी बसलेल्या या व्यक्तीचं शरीर अजूनही मेडिटेशन करतंय असं भासतंय. लामा दाशी - डोर्झो इटीगिलोव्ह यांच्या गुरुंची ही ममी असावी, असा तर्क आता लावण्यात येतोय. लामा दाशी यांचा जन्म १८५२ मध्ये झाला होता.  

मंगोलियाच्या सॉंगिनोखैरखान इथं २७ जानेवारी रोजी ही ममी आढळून आलीय. त्यानंतर, या 'ममी'ला पुढच्या फॉरेन्सिक टेस्टसाठी राजधानी उलानबतारकडे धाडण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.