परवेझ मुशर्रफनं केली बाळासाहेब ठाकरेंची तुलना लादेन, हाफिज सईदसोबत!

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तुलना २६/११च्या हल्ल्याचा मास्टरमांईड हाफिज सईदशी करून नवा वाद ओढवून घेतालाय.  

Updated: Oct 28, 2015, 02:08 PM IST
परवेझ मुशर्रफनं केली बाळासाहेब ठाकरेंची तुलना लादेन, हाफिज सईदसोबत! title=

कराची: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तुलना २६/११च्या हल्ल्याचा मास्टरमांईड हाफिज सईदशी करून नवा वाद ओढवून घेतालाय. जर बाळासाहेब ठाकरे भारतीयांचे हिरो असतील, तर हाफिज सईद आणि बिन लादेन आमचे हिरो आहेत, असं एका मुलाखतीत म्हटलंय. त्यामुळं पाकिस्तानच जगात दहशतवादाचा प्रसार करत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. 

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी कबुल केलंय की, पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतं, मारला गेलेला दहशतवादी ओसामा बिन लादेन आणि जवाहिरी पाकिस्तानचे हिरो आहेत. 

आणखी वाचा - व्हिडिओ : अमेरिकेत सार्वजनिकरित्या पाकिस्तानची 'छि...थू'

आपल्या मुलाखतीत मुशर्रफ म्हणाले, पहिले दहशतवादी आपल्या जीवावर उदार होऊन काश्मीरसाठी लढत आहेत. आता काळ बदललाय ते आमच्या लोकांनाही मारत आहेत. तालिबानच्या मदतीनंच पाकिस्ताननं रशियाला अफगाणिस्तानातून बाहेर काढलं होतं.

माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येबाबत बोलतांना ते म्हणाले की, मी स्वत: बेनझीर भुट्टोला संकटाबद्दल सांगितलं होतं. बेनझीरवर हल्ला होईल अशा बातम्या येतच होत्या. याबद्दल त्यांना सांगण्यातंही आलं होतं. मला खात्री आहे की, बेतुल्ला मेहसूदनं बेनझीरवर हल्ला करवला, मात्र त्याच्या मागे कुणाचा हात होता हे माहिती झालं नाहीय. 

आणखी वाचा -  पाकिस्तानातील मराठी कुटुंबाचा शिवसेनेला सवाल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.