‘सॅण्डी’ हा अमेरिकेला अल्लाचाच तडाखा -मौलवी

By Prashant Jadhav | Last Updated: Saturday, November 3, 2012 - 11:52

www.24taas.com, कैरो
‘सॅण्डी’ या भयंकर वादळाचा अमेरिकेला बसलेल्या तडाख्यानंतर इजिप्तमधील मुल्ला मौलवींचे मत आहे. ‘सॅण्डी’ हा अमेरिकेला ‘अल्ला’ने दिलेला तडाखा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रेषित महंमद पैगंबर यांच्यावरील बदनामीकारक चित्रपटाच्या निर्मितीसह अमेरिकनांनी केलेल्या अनंत पापांची ‘सॅण्डी’ वादळ ही सजा आहे, असे मत इजिप्तमधील इस्लामी धर्मगुरूंनी व्यक्त केले आहे.
अमेरिकेत आलेले ‘सॅण्डी’ वादळ आणि त्याच्या कारणांबद्दल लोकांना आश्चीर्य वाटते. पण माझ्या मते पैगंबरांच्या अपमानाचा अल्लाने घेतलेला हा सूड आहे, असे वक्तव्य इजिप्तमधील कट्टरवादी धर्मगुरू वागदी घोनिम यांनी ट्विटरवरून केले आहे.
सौदी अरेबियातील धर्मगुरू सलमान-अल-औदा यानी तर अमेरिकेत ‘सॅण्डी’ वादळात १४० लोकांचा गेलेला बळी हा धोक्याचा इशारा असून अमेरिकेनांनी इस्लाम धर्म स्वीकारावा, असे म्हटले आहे. दरम्यान, काही मुस्लिमांनी मात्र ‘सॅण्डी’ वादळाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्यांच्या दु:खावर डागण्या देणे घृणास्पद आहे, अशी टीका धर्मगुरूंच्या या वक्तव्यावर केली आहे.

First Published: Saturday, November 3, 2012 - 11:49
comments powered by Disqus