मोदींनी तोडला ओबामांचा रेकॉर्ड!

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेद्वार म्हणून घोषित करण्यात आलेले नरेंद्र मोदी गुगलवरील सर्वाधिक लोकप्रिय नेता ठरलेत.

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेद्वार म्हणून घोषित करण्यात आलेले नरेंद्र मोदी गुगलवरील सर्वाधिक लोकप्रिय नेता ठरलेत.
सर्च इंजिन गुगलवर एका दिवसात नरेंद्र मोदींच्या नावाने एक अब्जाहून अधिक वेळा सर्च केल्याचा रेकॉर्ड नोंदवण्यात आलाय. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यानावे हा रेकॉर्ड होता.
अमेरिकेतील निवडणूकांच्या वेळी बराक ओबामांचं नाव घोषीत झाल्यानंतर त्यांच्या नावे ९८ लाख ७७ हजार ३३२ वेळा (१,०००,०७७,३३२ वेळा) सर्च केल्याची नोंद आहे. तर मोदींचे नाव एक अब्ज ७७ हजार ३३२ वेळा सर्च केल्याची नोंद आहे.

मोदी हो देशातील सर्वात जास्त लक्षवेधी नेते ठरलेत. शुक्रवारी, लालकृष्ण अडवाणी यांचा विरोध डावलून भाजपनं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी बहाल केली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.