मोदी-शरीफ चर्चा संपली; २०१६ मध्ये मोदी पाकिस्तानात जाणार!

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आज वर्षभराहून अधिक काळानंतर प्रथमच भेट घेतली. 

Updated: Jul 10, 2015, 12:13 PM IST
मोदी-शरीफ चर्चा संपली; २०१६ मध्ये मोदी पाकिस्तानात जाणार! title=

ऊफा (रशिया) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आज वर्षभराहून अधिक काळानंतर प्रथमच भेट घेतली. 

यावेळी आज दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये तब्बल ५५ मिनिटं चर्चा झाली. यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन सादर केलं. यावेळी, नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्यात दहशतावादासमवेत इतरही मुद्यांवर झाली चर्चा झाली, दहशतवादाविरुद्ध दोन्हीही देश कडक पावलं उचलणार असल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी म्हटलंय. 

तसंच, यावेळी पुढच्या वर्षी म्हणजेच २०१६ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. सार्क समिटमध्ये सहभागी होण्यासाठी मोदी पाकिस्तानात जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. 

या भेटीत पाकनं गेल्यावर्षभरात वारंवार केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबद्दल चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमांईट झकी उर रहमान लक्वीला पाक कोर्टानं दिलेल्या जामीनाबद्दलही भारत निषेध व्यक्त केलाय. 

रशियातल्या ऊफा शहरात आज शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या नेत्यांची शिखर परिषद होतेय. या संघटनेत भारताला निरीक्षक देशाचा दर्जा देण्यात आलाय. मोदींच्या शपथविधीला शरीफ यांची उपस्थितीत, आणि त्यानंतर मोदी-शरीफ यांच्यात प्रस्थापित झालेल्या सलोखा वर्षभरापूर्वी बराच चर्चेत आला. पहिला भेटीतच भारत-पाक संबंध सुधारण्याचा निश्चय दोन्ही नेत्यांनी केला होता. पण पाकनं काश्मीरमधल्या फुटीरतावादी हुर्रियतच्या नेत्यांशी स्वतंत्र बातचीत करण्याचा घाट घातला. त्यावर भारतानं तीव्र निषेध व्यक्त करून पाकशी होणाऱ्या सगळ्या चर्चा थांबवल्या होत्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.