पृथ्वीसारख्या दुसऱ्या ग्रहाचा शोध, नासाचा दावा, 'केपलर ४५२बी' नाव

पृथ्वीप्रमाणं दिसणाऱ्या आणि आकार असणाऱ्या एका ग्रहाचा शोध लागल्याचा दावा नासानं केलाय. त्याचं नाव 'केपलर ४५२बी' असं ठेवण्यात आलंय. नासानं प्रसिद्धीपत्रक काढून हा शोध जाहीर केलाय. 

Updated: Jul 24, 2015, 03:22 PM IST
पृथ्वीसारख्या दुसऱ्या ग्रहाचा शोध, नासाचा दावा, 'केपलर ४५२बी' नाव title=

नवी दिल्ली: पृथ्वीप्रमाणं दिसणाऱ्या आणि आकार असणाऱ्या एका ग्रहाचा शोध लागल्याचा दावा नासानं केलाय. त्याचं नाव 'केपलर ४५२बी' असं ठेवण्यात आलंय. नासानं प्रसिद्धीपत्रक काढून हा शोध जाहीर केलाय. 

अजून एका पृथ्वीचा शोध लावण्याच्या मोहिमेतलं हे मोठं यश मानलं जातंय. सूर्यासारख्या एका ताऱ्याच्या भोवती फिरणारा हा ग्रह आहे. त्यामुळं सूर्य आणि त्याभोवती फिरणारे ग्रह यासारखीच आणखी एक सूर्यमालाच नासाला गवसलीय. हा ग्रह पृथ्वीपेक्षा आकारानं मोठा आहे. 

पृथ्वी ज्याप्रमाणं ३६५ दिवसांत सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करते, त्याप्रमाणं हा ग्रह ३८५ दिवसात सूर्यप्रदक्षिणा पूर्ण करतो. या ग्रहामुळं पृथ्वीच्या भावाचाच शोध लागला असून पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या व्युत्पत्तीचा अभ्यास करण्यासाठी या ग्रहाची मदत होईल, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.