नासाच्या 'एपिक' कॅमेऱ्यात पृथ्वीची अद्वितीय छायाचित्र

नासाने पहिल्यांदा १६ लाख किलोमीटरवरून पृथ्वीची छायाचित्र घेतले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विटरवर हे छायाचित्र ट्विट करून पृथ्वीला वाचवण्यावर जोर दिलेला आहे.

Updated: Jul 22, 2015, 12:06 PM IST
नासाच्या 'एपिक' कॅमेऱ्यात पृथ्वीची अद्वितीय छायाचित्र title=

वॉशिंग्टन : नासाने पहिल्यांदा १६ लाख किलोमीटरवरून पृथ्वीची छायाचित्र घेतले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विटरवर हे छायाचित्र ट्विट करून पृथ्वीला वाचवण्यावर जोर दिलेला आहे.

डीप स्पेस क्लायमेट ऑबजरवेटरी उपग्रहावर लावलेल्या नासाच्या पॉलिक्रोमेटीक इमेजिंग कॅमेरा (एपिक) मधून घेतलेल्या तीन वेगवेगळ्या छायाचित्रांमधून एक रंगीत छायाचित्र बनवले आहे. 

ही छायाचित्रे नासाने सहा जुलैला घेतली होती. या छायाचित्रात  वाळवंट, नद्यांची अवस्था, किचकट ढगांचे नमुने दिसत आहेत. ही छायाचित्रे आल्यानंतर अमेरिकेचे  राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपल्या ट्विटरच्या पेजवरून हे छायाचित्र पोस्ट केले. 

नासाने घेतलेले ह्या छायाचित्रातपृथ्वी एका नवीन संगमरवराप्रमाणे दिसत आहे. या छायाचित्रावरून असे कळून येते कि हा ग्रह आपल्याला वाचवणे खूप गरजेचे आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.