नवीन तंत्रज्ञान : मृत व्यक्ती पुन्हा उठून बसल्या!

मेलबर्नमध्ये एक चमत्कारच पाहायला मिळालाय. वैज्ञानिकदृष्ट्या मृत घोषित केल्या गेलेल्या एका ३० वर्षीय मृत व्यक्तीला ४० मिनिटानंतर पुन्हा जिवंत करण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 14, 2013, 12:27 PM IST

www.24taas.com, मेलबर्न
मेलबर्नमध्ये एक चमत्कारच पाहायला मिळालाय. वैज्ञानिकदृष्ट्या मृत घोषित केल्या गेलेल्या एका ३० वर्षीय मृत व्यक्तीला ४० मिनिटानंतर पुन्हा जिवंत करण्यात आलंय. मृत व्यक्तीला जिवंत करण्याच्या एका विशेष तंत्रज्ञानामुळे हे शक्य होऊ शकलंय. हे तंत्रज्ञान अजूनही प्रायोगिक स्वरुपात आहे.
कॉलिन फीडलर हे विक्टोरियाचे रहिवासी आहेत. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. ‘अल्फेड’ हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर जवळजवळ ४० ते ६० मिनिटं ते त्याच अवस्थेत होते. परंतू, त्यानंतर या नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं त्यांना पुन्हा जिवंत करण्यात आलं. केवळ फीडलर यांनाच नाही तर त्यांच्यासोबतच आणखी दोन जणांना या तंत्रज्ञानाच्या मदतीनं जीवदान मिळालंय. त्यांनाही हृदयविकाराचा त्रास होता. या तिघांवरही हा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आलाय.
हॉस्पीटलमध्ये दोन नवीन मशिन – मॅकेनिकल सीपीआर मशीन आणि पोर्टेबल हार्ट-लंग मशीनची ट्रायल सुरू होती. सीपीआर छातीवर प्रेशर देण्याचं काम करते तर पोर्टेबल हार्ट-लंग मशीन शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचा उदा. मेंदूपर्यंत पोहचणाऱ्या ऑक्सिजन आणि रक्ताचं योग्य प्रमाणात राखून ठेवते.

`हेरॉल्ड` या वर्तमानपत्राच्या माहितीप्रमाणे, फीडलर यांना गेल्या वर्षी हार्टअटॅक आला होता तसंच त्यांना ४० मिनिटांपर्यंत क्लिनिकली डेड ठरवलं गेलं होतं. पण, आत्ता एका वर्षानंतर ते म्हणतात की, ‘मी खरंच भाग्यशाली आहे’.
या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं आत्तापर्यंत सात जणांवर प्रयोग करण्यात आल्याचं आणि तो प्रयोग यशस्वी करण्यात आलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.