पोपच्या निवडीवर ओबामा आनंदी

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, March 14, 2013 - 22:17

www.24taas.com, वॉशिंग्टन
सिस्टिन चॅपेलच्या चिमणीतून पांढरा धूर आला, आणि व्हॅटिकन सिटीमध्ये पोपची निवड झाली. यावेळी प्रथमच युरोप बाहेरील पोप निवडले गेले आहेत. प्रथमच अमेरीका खंडातील अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारियो बोरगोगलियो पोप बनले आहेत. या गोष्टीचा अमेरिकेने आनंद व्यक्त केला आहे. लाखो अमेरिकन्सनी हा आनंद पार्टी करून व्यक्त केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पोपच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “२००० वर्षांहूनही अधिक काळ प्रेम आणि सहकार्याचा संदेश देणाऱ्या पोपच्या पदावर अमेरिकन व्यक्ती बसली आहे. आपण एकमेकांमध्ये इश्वर पाहावा हाच संदेश यातून मिळतो.” असा विचार ओबामांनी मांडला.
ओबामा म्हणाले, की अमेरिकेतून नवे पोप निवडले गेल्यामुळे आजच्या जगातील शक्ती आणि उत्साह दिसून येत आहे. लाखो लॅटिन अमेरिकन लोकांसह अमेरिकेतील लोकही आनंद व्यक्त करत आहे. नव्या पोपसोबत आम्ही विश्वात शांती, सुरक्षा आणि सर्वांच्या सन्मानासाठी काम करू.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जो बिडेन यांनी म्हटलं, कॅथलिक चर्च अमेरिका तसंच जगातील अब्जावधी लोकांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका पार पाडतं. ही गोष्ट केवळ धर्माशी संबंधित नसून मानवता आणि शांततेशी जोडावा.

First Published: Thursday, March 14, 2013 - 22:17
comments powered by Disqus