लाच प्रकरणी माजी पंतप्रधानांना दीड वर्षांची शिक्षा

इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना लाच घेतल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. एहुद ओल्मर्ट हे तुरुंगवास भोगावा लागणारे  इस्राईलचे पहिलेच माजी पंतप्रधान आहेत. ओल्मर्ट यांच्यावर १ लाख २८ हजार ५०० डॉलरची लाच घेतल्याचा आरोप आहे. 

Updated: Dec 30, 2015, 12:00 AM IST
लाच प्रकरणी माजी पंतप्रधानांना दीड वर्षांची शिक्षा title=

जेरुसलेम : इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना लाच घेतल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. एहुद ओल्मर्ट हे तुरुंगवास भोगावा लागणारे  इस्राईलचे पहिलेच माजी पंतप्रधान आहेत. ओल्मर्ट यांच्यावर १ लाख २८ हजार ५०० डॉलरची लाच घेतल्याचा आरोप आहे. 

एहुद ओल्मर्ट हे आता ७० वर्षांचे आहेत. ओल्मर्ट २००६ ते २००९ या कालावधीमध्ये ते इस्राईलचे पंतप्रधान होते. विविध कामांसाठी लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. 

या आरोपांमध्ये तुमच्यावर आरोपपत्र दाखल होणार आहे, असा इशारा पोलिसांनी दिल्यानंतर ओल्मर्ट यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणी 2014 च्या मेमध्ये ओल्मर्ट यांना दोन प्रकरणांमध्ये मिळून एकूण सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात ओल्मर्ट यांना दोषमुक्त केले आणि त्यांची शिक्षा कमी करून दीड वर्षांचा तुरुंगवास भोगण्याचा आदेश दिला.