ओसामाचा बिन लादेनचा मृतदेह समुद्रात दफन

Updated: Oct 8, 2014, 02:01 PM IST
ओसामाचा बिन लादेनचा मृतदेह समुद्रात दफन title=

अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला अमेरिकी सैनिकांनी गोळ्या घालून ठार केलं होतं. त्यानंतर त्याचा मृतदेह समुद्रात उभ्या असलेला 'यूएसएस कार्ल विन्सन' या विमानवाहू युद्धनौकेद्वारे नेण्यात आला होता. इंथं त्याचा मुस्लिम रिती रिवाजाप्रमाणं मृतदेह दफन करण्यात आला.
 
अरेबिकमध्ये प्रार्थना म्हटल्यानंतर त्याचा मृतदेह एका जड काळ्या पिशवीत ठेवण्यात आला. लादेनचा मृतदेह पाण्यातून वर येऊ नये यासाठी त्या पिशवीत 300 पाऊंड वजनाच्या लोखंडी साखळ्या ठेवण्यात आल्या. त्याचा मृतदेह समुद्रार्पण करण्यासाठी ही पिशवी जहाजाच्या डेकवर एका पांढऱ्या टेबलवर ठेवण्यात आली. टेबल अगदी कडेला ठेवण्यात आलं. जेणेकरून ही पिशवी समुद्रात पडेल, अशी योजना केली होती. परंतु मृतदेह असलेली पिशवी एवढी जड झाली होती की, ती समुद्रात ढकलताना तिच्यासोबत तो टेबल देखील समुद्रात पडला होता.
 
ही पिशवी समुद्रात पडल्यानंतर लगेच नाहीशी झाली. पण, टेबल मात्र पुन्हा पाण्यावर दिसून आला. या सर्व घटनेचे साक्षीदार असलेले अमेरिकेचे गुप्तहेर यंत्रणा सीआयएचे तत्कालीन प्रमुख आणि विद्यामान संरक्षणमंत्री लिऑन पॅनेट्टा यांनी ही माहिती उघड केली आहे.
 
पॅनेट्ट यांचं 'वर्दी फाइट्सः अ मेमॉयर ऑफ लीडरशिप इन वॉर अँड पीस' हे पुस्तक आज प्रकाशित झालं. यात त्यांनी लादेनच्या मृत्यूपासून त्याचा मृतदेह समुद्रार्पण करण्यापर्यंतचा सर्व घनाक्रम सविस्तरपणे दिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.