ओसामा २००२ नंतर पाकमध्येच होता!

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, July 9, 2013 - 17:37

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
न्यूयॉर्कमध्ये ९/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन आणि त्याचा परिवार २००१ नंतर पाकिस्तानात वास्तव्यास आले, पाकिस्तानवर अमेरिकेने बेजबाबदारपणाचा आरोप लावण्यात आल्याचे असे वृत्त ` द डॉन ` ने ` एबटाबाद कमिशन `च्या अहवालाच्या हवाल्याने दिले आहे.
ऑक्टोबर २००१ ला लादेनचे कुटुंबीय पाकिस्तानात स्थलांतरित झाले आणि ओसामा स्वतः २००२च्या मध्यास पेशावरमध्ये त्यांना सामील झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

९/११ पूर्वी झालेल्या काही हल्ल्यात सहभागी असलेल्या खालिद बिन अत्ताश याच्या अटकेनंतरच खऱ्या अर्थाने लादेनच्या ठावठिकाण्याचा मार्ग माहित झाला. अत्ताश हा लादेनचा अत्यंत विश्वासू सहकारी होता. आफ्रिका दूतावासासारख्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता. कराचीतून २००२मध्ये त्याची अटक हे अमेरिकेची सर्वात मोठे यश होते. कारण, त्यानेच पुढचे दुवे खुले करून दिले.
अबू अहमद अली कुवैती हा ओसामाचा उजवा हात होता. कुवेतमध्ये जन्मलेला अबू हा पाकिस्तानी नागरिक होता. तो ओसामाला नियमित कुरियर घेऊन जात असे. अत्ताशने अमेरिकेला कुवैतीपर्यंत पोहोचविले आणि कुवैतीने ओसामापर्यंत अमेरिकेला पोहचविले.
कुवैतीचा शोध हा अमेरिकेचे गुप्तचर खाते असलेल्या ` सीआयए ` साठी मोठे आव्हान ठरला. सीआयएने पाकिस्तानला २००९ ते २०१० या काळात चार फोननंबर दिले होते. मात्र , ते कुणाचे आहेत , याबाबत काहीही माहिती दिलेली नव्हती. बहुतांश वेळा हे फोन बंदच आढळले. मात्र , तरीही त्याबाबतचा शोध सुरूच राहिला. ऑक्टोबर-नोव्हेंबर २००१ पासून कुवैती, ओसामाच्या कुटुंबीयांसमवेत कराचीत होता. नंतर ते सर्वजण पेशावरमध्ये गेले आणि २००२च्या मध्यास त्यांना ओसामाही जाऊन मिळाला. त्यानंतर स्वात खोऱ्यात ओसामा खालिद शेख मोहंम्मद यांना भेटला, अशी माहिती अहवालात असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
लादेनचा खात्मा करण्याच्या अमेरिकेच्या मोहिमेबाबतची बरीच स्फोटक माहिती एबटाबाद अहवालात आहे. मात्र, अद्याप तो खुला करण्यात आलेला नाही. काही विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त देण्यात आल्याचा दावा ` द डॉन ` ने केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, July 9, 2013 - 17:37
comments powered by Disqus