कोलंबियाच्या रस्त्यांवर रंगीबेरंगी खड्डे

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, September 21, 2013 - 10:15

ww.24taas.com, झी मीडिया, कोलंबिया
भारताप्रमाणेच रस्त्यांवरील खड्डयांची समस्या कोलंबियातील नागरिकांनाही सतावत आहे. मात्र या खड्ड्यांवरून खळ्ळफट्याक करण्या ऐवजी कोलंबियात नागरिकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं आहे.
विशेष म्हणजे इथल्या कलाकारांनी यात पुढाकार घेतलाय. या कलाकारांनी खड्ड्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी चक्क खड्ड्यांवर ग्रॅफीटी पेंटींग काढत प्रशासनाचं या खड्ड्यांकडे लक्ष वेधलं.
एका सामाजीक समस्येला वाचा फोडण्यासाठी कालाकारांनी घेतलेला पुढाकार आणि त्यासाठी कलेच्या माध्यमाचा केलेला सडेतोड वपर भारतीयांसाठी नक्कीच अनुकरणीय आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, September 21, 2013 - 10:15
comments powered by Disqus