भारतीय लष्कर चौकीवर पाककडून गोळीबार

जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे लष्कराच्या छावणीवर गोळीबार पाकिस्तानने गोळीबार केला. पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात आलेय.

सुरेंद्र गांगण | Updated: Jul 27, 2013, 03:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे लष्कराच्या छावणीवर गोळीबार पाकिस्तानने गोळीबार केला. पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात आलेय.
सकाळी प्रत्यक्ष ताबा रेषेवर असलेल्या भारतीय लष्कराच्या छावणीवर पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. पुंछ सेक्टरमधील शाहपूर भागात असलेल्या भारतीय चौकीवर सकाळी सातच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त नाही.

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनीही गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची या महिन्यातील ही चौथी वेळ आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.