पाकिस्तान वायुसेना प्रमुखाची भारताला धमकी

भारतीय लष्करानं नौशेरा सेक्टरमध्ये पाकच्या चौक्या उद्धवस्त केल्यानं आता पाकिस्तानच्या पायाखलाची जमीन सरकली आहे. आज पाकिस्तानचे वायुसेना प्रमुखांनी भारताला धमकी दिली आहे. 

Updated: May 24, 2017, 01:22 PM IST
पाकिस्तान वायुसेना प्रमुखाची भारताला धमकी title=

स्कार्दू : भारतीय लष्करानं नौशेरा सेक्टरमध्ये पाकच्या चौक्या उद्धवस्त केल्यानं आता पाकिस्तानच्या पायाखलाची जमीन सरकली आहे. आज पाकिस्तानचे वायुसेना प्रमुखांनी भारताला धमकी दिली आहे. 

पाकिस्तानच्या स्कार्दूमध्ये असणाऱ्या वायूसेना तळावरून पाकिस्तानचे वायूसेना प्रमुख कादरी यांनी मिराज विमानानं सियाचिनच्या दिशेनं सॉर्टी केल्याचा दावा आज पाकिस्तानी मिडियानं केला आहे. त्यानंतर बोलताना वायूसेना प्रमुख सोहेल अमान यांनी भारतीय हल्ल्याचं उत्तर देऊन असं म्हटलं आहे. 

एवढंच नाही भारताला आम्ही असा धडा शिकवू की भारताच्या अनेक पिढ्या आठवणीत ठेवतील.