पाकच्या नापाक कारवाया सुरुच

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, August 13, 2013 - 13:17

www.24taas.com, नवी दिल्ली
पाकच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाक सैन्याकडून रात्रीपासून पूँछ सेक्टरमध्ये गोळीबार सुरु आहे.
गेल्या ३ दिवसांत आठव्यांदा पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. इतक्या नापाक कारवायानंतरही पाकच्या उलट्या बोंबा सुरु आहेत. भारताकडूनच शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकनं केलाय. इतकंच नाहीतर भारताच्या उप-उच्चायुक्तांना पाकनं पाचारण करत प्रश्न उपस्थित केले.
१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमिवर दिल्ली आणि मुंबईत हायअलर्ट जाहीर करण्यात आलंय. मुंबई २६-११ हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद यांनी दिल्लीत हल्ल्याची धमकी दिलीये. याबाबत आयबीनं दिल्ली पोलिसांना जागृकतेसंदर्भात दोन निरोप दिलेत. त्यामुळं दिल्लीसह मुंबईत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीये.

पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्ल्यानंतर जम्मूमध्ये असलेल्या तणावादरम्यान थांबवण्यात आलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आलीय. चार दिवसांच्या ब्रेकनंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू झालीय. आज सकाळपासून भाविकांना अमरनाथकडे रवाना करण्यात आलं. तीन दिवसांत आठव्यांदा पाकिस्तानकडून गोळीबार झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जवानही त्यांच्यासोबत आहेत. जम्मूच्या आठ जिल्ह्यात अजूनही कर्फ्यू लागू आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, August 13, 2013 - 13:14
comments powered by Disqus