पाकिस्तान भ्रष्टाचारात भारताच्या पुढे

चीनलाही भारताने आता भ्रष्टाचारामध्ये मागे टाकलं आहे. मात्र भारताशेजारील तुलनेने लहान असणऱ्या पाकिस्तानात भारताहूनही जास्त भ्रष्टाचार होत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 5, 2012, 06:48 PM IST

भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारत दरवर्षी आपले स्वतःचेच रेकॉर्ड्स मोडत आहे. जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेल्या
www.24taas.com, बर्लिन
चीनलाही भारताने आता भ्रष्टाचारामध्ये मागे टाकलं आहे. मात्र भारताशेजारील तुलनेने लहान असणऱ्या पाकिस्तानात भारताहूनही जास्त भ्रष्टाचार होत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
जर्मनीमधील एका संस्थेने भ्रष्टाचारासंबंधी केलेल्या स्रवेक्षणातून जो अहवाल प्रसिद्ध झाला आहे, त्यात 176 भ्रष्टाचारी देशांची यादी दिली गेली आहे. यामध्ये भारताचा क्रमांक 94 आहे.
उत्तर कोरिया, सोमालिया, अफगाणिस्तान, म्यानमार, उझबेकिस्तान हे देश जगातील स्रवाधिक भ्रष्ट देश असल्याचं या अहवालात दिलं गेलं आहे. तर न्यूझीलंड, सिंगापुर, स्वीडन डेन्मार्क आणि फिनलंड येथे सर्वांत कमी भ्रष्टाचार होतो.