पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा हल्ला

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, August 10, 2013 - 09:38

www.24taas.com, झी मीडिया, जम्मू
पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. मुजोर पाक सैन्यानं पुन्हा एकदा पूँछच्या खरी करमा परिसरात गोळीबार केलाय. या आठवड्यातील दुसऱ्यांदा हल्ला पाक सैन्याकडून करण्यात आलाय.
करमा परिसरात मध्यरात्री २.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय. यावेळी भारतीय सैन्यानं पाकला चोख प्रत्युत्तर दिलं. गोळीबार करत सीमेत घुसखोरी करण्याचा पाकचा डाव भारतीय जवानांनी हाणून पाडलाय.
अनेक दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. मात्र भारतीय जवानांनी पाकचे क्रूर मनसुबे उधळून लावलेत. दरम्यान, याआधीच्या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झालेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 10, 2013 - 09:38
comments powered by Disqus