पाकिस्तान सैन्याकडून सीमा भागात गोळीबार

Last Updated: Saturday, July 12, 2014 - 16:10
पाकिस्तान सैन्याकडून सीमा भागात गोळीबार

नवी दिल्ली : पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीर येथील आरएस सेक्टरमधील पिंडी आऊटपोस्टवर गोळीबार केला.

पाकसैन्याच्या या गोळीबारीत कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, भारताने चोख प्रत्युत्तर दिले. या आधी पाकिस्तानकडून 13 जून रोजी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाक सैन्याकडून वारंवार असे उल्लंघन होत आहे.

सीमा भागात जनरल विक्रम सिंग दोन दिवस सीमावर्ती भागाचा दौरा करणार आहेत. ते तेथील परिस्थिती जाणून घेणार आहेक, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

PTI
First Published: Saturday, July 12, 2014 - 16:06
comments powered by Disqus