अमेरिकेत विमान दुर्घटना, २ ठार, १८० जखमी

दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाईन्सचं विमान अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर उतरत असताना क्रॅश झालंय. यामुळे प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर पडावं लागलं

Updated: Jul 8, 2013, 07:23 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाईन्सचं विमान अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर उतरत असताना क्रॅश झालंय. यामुळे प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर पडावं लागलं. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. तर १८० लोक जखमी झालेत.
विमानतळावर उतरत असताना विमानाचा मागील भाग फाटला गेला त्यामुळे ही दुर्घटना झाली. ही दुर्घटना काल सकाळी ११.३० वाजता घडली. यात १० प्रवासी गंभीर अवस्थेत आहेत. या विमानात २९१ प्रवासी आणि १६ अधिकारी सदस्य होते, अशी माहिती विमान अधिकाऱ्यांनी दिलीय.

या विमानात ३ भारतीय प्रवासीही होते. यातील एका प्रवाशाच्या गळ्याच्या हाडाला दुखापत झालीय. बोइंगचं ७७७-२०० जातीचं लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी उपयुक्त असलेलं हे विमान आहे. या विमानात एकूण ७७ कोरियाचे, १४१ चीनी, ६१ अमेरिकन आणि एक जपानी नागरिक होते. या दुर्घटनेनंतर गृह सुरक्षा आणि दहशतवादी विरोधी प्रकरणातील सहाय्यक लीजा मोनाको यांनी तात्काळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना सूचित केल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.