भरारी घेताना विमानाचं इंजिन बिघडलं अन्....

आकाशात भरारी मारत असताना अचानक एका विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि एका क्षणासाठी पायलटसहीत इतर क्रू मेंबर्सच्या काळाजाच ठोकाच चुकला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 13, 2014, 12:42 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, सिडनी
आकाशात भरारी मारत असताना अचानक एका विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि एका क्षणासाठी पायलटसहीत इतर क्रू मेंबर्सच्या काळाजाच ठोकाच चुकला.
ही घटना घडलीय ऑस्ट्रेलियामध्ये... एअरक्राफ्ट ऑस्ट्रेलियाच्या ‘ब्लू माउंट’च्या वरतून उडत असतानाच एअरक्राफ्टचं इंजिन खराब झाल्यानं इंजिनमधून अचानक आवाज येणं सुरू झालं, असं या स्थानिक निवासी रॉबर्ट रोस यांनी म्हटलंय. न्यू साउथ वेल्सनजिक राहणारे रहिवासी हा सगळा गोंधळ जमिनीवरून पाहत होते... त्यापैंकीच रोस हे एक आहेत.
‘इंजिन एकदा बंद करून पुन्हा सुरू करण्यात आलं... पण, ते पुन्हा धडधडू लागलं... नंतर ते पूर्णत: बंद पडलं... काही सेकंदात विमान हवेत तरंगू लागलं. मला वाटलं की पायलट विमानातून उडी घेईल आणि स्वत:चे प्राण वाचवेल. पण, मग असं काही घडलं की आमचा डोळ्यांवर विश्वासच राहिला नाही’ असं रॉबर्ट म्हणतात.
हे दृश्यं पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला होता. कारण, अचानक एअरक्राफ्टच्या वरती एक पॅराशूट उघडलं गेलं आणि विमानाची खाली उतरण्याची गती कमी झाली... आणि एअरक्राफ्ट एका घरासमोर बनलेल्या गार्डनमध्ये खाली उतरलं... एमर्जन्सी लँडींग करण्यात आली होती. हे विमान पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. विमानातील दोन प्रवासी या प्रकारामुळे थोडीफार दुखापतदेखील झाली, पण सगळ्यांचे प्राण मात्र वाचले.
पॅराशूटच्या साहाय्यानं विमानाची लँडींग... अपघात टळू शकतात
अनेक दुर्घटना टाळण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरल्याचं आपल्याला आढळून येईल. यामध्ये, एअरक्राफ्टच्या कॉकपिटमध्ये एक हँडल असतो. या हँडलला खेचल्यावर विमानाच्या वरच्या भागात लावली गेलेली कव्हर प्लेट बाजुला होते आणि पॅराशूट बाहेर येतं. आत्तापर्यंत मोजक्याच विमानांमध्ये ही पद्धत वापरलेली आढळते. पण, यापद्धतीनं अनेक अपघात टाळले गेलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.