पगाराच्या बाबतीत पंतप्रधान मोदी ११ व्या क्रमांकावर...

आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्षांच्या वेतनाची बऱ्याचदा तुलना चर्चेचा विषय ठरते. 

Updated: Mar 13, 2015, 12:15 PM IST
पगाराच्या बाबतीत पंतप्रधान मोदी ११ व्या क्रमांकावर...  title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्षांच्या वेतनाची बऱ्याचदा तुलना चर्चेचा विषय ठरते. 

एका अमेरिकन चॅनलनं माहितीच्या अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वार्षिक वेतन १९ लाख रुपये असल्याचं सांगितलंय. जगभरात सर्वांत अधिक वेतन अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना मिळतं, असंही या चॅनलनं म्हटलंय. ओबामा यांना वार्षिक अडीच करोड रुपयांहून जास्त वेतन मिळतं. शिवाय, ३० लाख रुपये वेगळे मिळतात जे टॅक्स फ्री खर्चात वर्ग केले जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात सर्वांत जास्त पागार मिळवणाऱ्या नेत्यांच्या यादीत ११ व्या क्रमांकावर येतात. त्यांचं वार्षिक वेतन ३०,३०० डॉलरहून थोडं अधिक म्हणजेच जवळपास १९ लाख रुपये आहे. मोदी यांचं मूळ वेतन ५० हजार रुपये आहे. याशिवाय, दैनिक भत्त्यानुसार मासिक ६२ हजार रुपये आणि संसद भत्त्याप्रमाणे त्यांना ४५ हजार रुपये मिळतात. सरकारी निवारस आणि प्रवासाच्या सुविधांशिवाय त्यांना खाजगी कर्मचाऱ्यांसाठी भत्ते मिळतात. 

दुसरीकडे, जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्थेचे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना वार्षिक १३.७३ लाख रुपये वेतन मिळतं. जिनपिंग जगभरात १२ व्या क्रमांकावर आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर... त्यांना वार्षिक २.६ लाख डॉलर (१.६२ करोड रुपये) वेतन मिळतं. याशिवाय, त्यांना प्रवास मनोरंजन यांसारखे ३० हजार डॉलर्सचे भत्तेही मिळतात. 

कुणाला मिळतं किती वेतन? (वार्षिक)

  • भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी - १९ लाख रुपये

  • चीनी राष्ट्रपति शी जिनपिंग - १३.७३ लाख रूपए

  • अमरिकन राष्ट्रपती बराक ओबामा - २.५ करोड़ रुपये (३० लाख रुपये वेगळे)

  • कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर - १.६२ करोड़ रूपए

  • जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मर्केल - १.४६ करोड़ रूपए

  • दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपति जैकब जुमा - १.४ करोड़ रुपये

  • रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पुतिन - जवळपास ८५ लाख

  • ब्राझिलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ - ७५ लाख रूपए  

  • ब्रिटेनचे प्रधानमंत्री डेविड कॅमरुन  - १.३४ करोड़ रुपये

  • जपानचे पंतप्रधान शिंजो अबे - १.२६ करोड़ रुपये

  • फ्रान्स के राष्ट्रपति फ्रान्स्वा ओलांद - १.२१ करोड़ रुपये

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.