`पेरु` खाल्ले म्हणून पोलिसांना केलं निलंबित

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या बागेतील पेरु खाल्ल्याने दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

Updated: Jun 11, 2014, 10:50 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था,इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या बागेतील पेरु खाल्ल्याने दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

शरीफ यांची लाहोर येथील निवासस्थानाजवळ पेरुची बाग आहे. या बागेची संरक्षणाची जबाबदारी पूर अबिद आणि सैफुल्ला या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर सोपविली होती. बागेत वेगवेगळ्या जातीच्या पेरुच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. मात्र या बागेतील पेरू या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी खाल्ले आणि म्हणूनच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

अशा प्रकारा वरुन पोलिसांना निलंबित करण्याची ही पहिली घटना नाही आहे. या आधीही शरीफ यांच्या बागेतील मोराला मांजरीने ठार मारल्याने 27 पोलिसांना निलंबित करण्यात आले होते.

पंतप्रधान शरीफ यांच्या 400 एकराचे असलेले फार्म हाऊसचे संरक्षण करण्यासाठी 2 हजार पोलिसांना सरकारने कामाला लावले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.