लहान मुलं पॉर्न पाहताहेत तर सावधान व्हा...

 कमी वयात मुलांसाठी सेक्स एक मोठ्या रहस्यासारखे असते. एका ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी केलेल्या अध्ययानानुसार जर लहान मुले कमी वयात पॉर्न फिल्म पाहतात, त्या वेळी ते कमी वयातच त्यांची यौन संबंध बनवण्याची उत्सुकतेत वाढ होते. तो त्या गोष्टीत गुंतून पडतो. 

Updated: Jun 5, 2015, 05:27 PM IST
लहान मुलं पॉर्न पाहताहेत तर सावधान व्हा... title=

मुंबई :  कमी वयात मुलांसाठी सेक्स एक मोठ्या रहस्यासारखे असते. एका ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी केलेल्या अध्ययानानुसार जर लहान मुले कमी वयात पॉर्न फिल्म पाहतात, त्या वेळी ते कमी वयातच त्यांची यौन संबंध बनवण्याची उत्सुकतेत वाढ होते. तो त्या गोष्टीत गुंतून पडतो. 

बर्नेट संस्थेच्या मॅगन लिम यांच्यानुसार इंटरनेट आणि सोशल मीडियामध्ये प्रत्येक प्रकारचा कंटेन्ट मिळतो. आपल्याला जे पण काही जाणून घ्यायची इच्छा आहे, ते सापडते. ही गोष्ट मुलांनांही सापडते. हे यापूर्वी होत नव्हते पण सहज उपलब्धतेमुळे ते शक्य झाले आहे. 

आपल्या अभ्यासात लिम यांनी १००० ऑस्ट्रेलियातील व्यक्तींवर संशोधन केले. त्यात १५ ते २९ या वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. त्यात आढळले की बहुतांशी व्यक्तींनी पहिल्यांदा पॉर्न फिल्म १४ व्या वर्षीच पाहिली होती. 

१० पैकी ९ पुरूष आणि ३ पैकी एक महिला प्रत्येक दिवशी १० वेळा पॉर्न पाहतात. अशा प्रकारच्या भ्रामक गोष्टींमुळे मुलांच्या मेंदूवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे सेक्स एज्युकेशनने त्यांना अवगत केले पाहिजे. त्यामुळे योग्य गोष्टी काय आहेत हे त्यांच्या लक्षात येत चुकीच्या गोष्टीमध्ये त्यांना अडकावे लागत नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.