पुरल्यानंतर तरूणी कबरीतून जिवंत बाहेर आली, पण.....

Updated: Aug 26, 2015, 01:37 PM IST
पुरल्यानंतर तरूणी कबरीतून जिवंत बाहेर आली, पण..... title=

नेयसी पर्झ ही १६ वर्षांची तरूणी कबरीतून जिवंत बाहेर आली आहे. या तरूणीला मृत समजून कबरीत पुरण्यात आलं होतं. मात्र कबरीत पुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा नवरा जेव्हा कबरीजवळ गेला, तेव्हा त्याला वाचवा असा आवाज आला.

त्यानंतर त्याने कबरीवरचं क्राँक्रीट तोडून शवपेटीतून तिला बाहेर काढलं, तिचा श्वासोच्छवास सुरू असल्याचं लक्षात आलं, तिच्यावर उपचार करण्यात आले, पण तीन तासात तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

एका गन फायरिंगचा आवाज आल्याने नेयसी जमिनीवर कोसळली होती, त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं तिच्या नातेवाईकांना वाटलं होतं. मात्र तिला पुरण्यात आल्यानंतर, कबरीजवळ दुसऱ्या दिवशी नवऱ्याला वाचवा म्हणून आवाज आल्यानंतर कबरीतून तिला काढण्यात आलं, पण तिचा मृत्यू झाला होता. नेयसी गरोदर असल्याचंही सांगण्यात येतंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.