ब्राझीलमध्ये महिलांना गर्भवती न होण्याचे आदेश

ब्राझीलमध्ये महिलांना काही दिवसांसाठी गर्भवती न होण्याचे आदेश दिलेत. यावर्षी ब्राझीलमध्ये २४०० नवजात बालकांमध्ये विचित्र आजार आढळून आला. या आजारामुळे या बालकांच्या मेंदूवर मोठा परिणाम झालाय. तसेच यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर थेट परिणाम झालाय.

Updated: Dec 24, 2015, 11:22 AM IST
ब्राझीलमध्ये महिलांना गर्भवती न होण्याचे आदेश title=

साओ पावलो : ब्राझीलमध्ये महिलांना काही दिवसांसाठी गर्भवती न होण्याचे आदेश दिलेत. यावर्षी ब्राझीलमध्ये २४०० नवजात बालकांमध्ये विचित्र आजार आढळून आला. या आजारामुळे या बालकांच्या मेंदूवर मोठा परिणाम झालाय. तसेच यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर थेट परिणाम झालाय.

ब्राझीलच्या स्वास्थ विभागाने दिेलेल्या माहितीनुसार, डासांमुळे हा आजार झाल्याचे समजतेय. २०१४मध्ये १४७ बालकांना हा आजार झाला. यामुळेच आजाराचा प्रार्दुभाव अधिक न होण्याच्या दृष्टीने हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

त्यामुळे ब्राझीलमध्ये जे पती-पत्नी मुलाबाबत विचार करत असतील तर काही काळासाठी हा निर्णय लांबवण्याचे आदेश ब्राझील सरकारने दिलेत.