ओबामा सोशल वेबसाईटवर दाखल; १२ तासांत १४ लाखांहून फॉलोअर्स

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विटरवर जोरदार एन्ट्री केलीय. केवळ १२ तासांत त्यांची फॉलोअर्सची संख्या १४ लाख ६० हजारांवर पोहचलीय.

Updated: May 19, 2015, 11:46 AM IST
ओबामा सोशल वेबसाईटवर दाखल; १२ तासांत १४ लाखांहून फॉलोअर्स title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विटरवर जोरदार एन्ट्री केलीय. केवळ १२ तासांत त्यांची फॉलोअर्सची संख्या १४ लाख ६० हजारांवर पोहचलीय.

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा किंवा अॅटदरेट पीओटीयूएस नावाच्या अकाऊंटवरून ओबामा पहिल्यांदाच जनतेशी सरळ सरळ संवाद साधणार आहेत. ओबामा आपल्या या अकाऊंटवरून सध्या ६५ लोकांना फॉलो करत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये कोणत्याही परदेशी नेत्याचा समावेश नाही.

विशेष म्हणजे, ओबामा ज्या ६५ लोकांना फॉलो करतात त्यामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळासोबत व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

'हलो ट्विटर, मी बराक... होय! सहा वर्षा झाले आणि शेवटी मला माझं स्वत:चं अकाऊंट मिळालंय' असं सोशल वेबसाईटवर एन्ट्री करताच ओबामा यांनी ट्विटरवरून आपलं पहिलं ट्विट केलं. त्यानंतर चार तासांनी ओबामांनी पुन्हा एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी आपल्या न्यू जर्सीच्या दौऱ्यासंबंधी माहिती दिली. 

यानंतर, माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन आणि ओबामा यांच्यात ट्विटर हँडलच्या नावासंबंधी बरीच चर्चा झाली. यावर लोकांची नजर राहिली. 

ओबामा जिन 65 लोगों को फॉलो करते हैं उनमें अधिकांश उनके मंत्रिमंडल के साथी या व्हाइट हाउस के अधिकारी हैं।

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.