अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी 'ट्रम्प'कार्ड बेधडक धडकणार?

यंदाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यक्तीमत्त्वाची जोरदार चर्चा होतेय. कुणी त्यांची प्रशंसा करतंय तर अनेकजण त्यांचा विरोधही करतायत...

Updated: Nov 7, 2016, 03:11 PM IST
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी 'ट्रम्प'कार्ड बेधडक धडकणार? title=

सचिन अरोरा, न्यूयॉर्क : यंदाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यक्तीमत्त्वाची जोरदार चर्चा होतेय. कुणी त्यांची प्रशंसा करतंय तर अनेकजण त्यांचा विरोधही करतायत...

व्यासपीठ बराक ओबामांचं... शो हिलरी क्लिंटन यांच्यासाठी... मात्र चर्चेत आले ते डोनाल्ड ट्रम्प.. हीच आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यक्तीमत्त्वाची झलक... विरोधकांच्या गोटातील सर्जिकल स्ट्राईकप्रमाणेच... बेधडक, फटकळ... काहीही म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये... अशा परिस्थितीत ट्रम्प यांना अमेरिकेत गेल्या काही वर्षातील राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतील सगळ्यात वादग्रस्त उमेदवार म्हटल्यास वावगं ठरु नये. 

बेधडक अंदाज 
ट्रम्प कुणालाही सोडत नाहीत.. समोरची व्यक्ती विरोधक आहे असं समजलं की ते त्याच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही... मात्र, ट्रम्प यांचा हाच बेधडक अंदाज त्यांना घातक ठरु शकतो. या अंदाजामुळंच अमेरिकेतील बहुतांशी मतदार ट्रम्प यांचा तितकाच तिरस्कारही करतो. अमेरिकेतील मॅनहटनमधील दोन युवक चक्क हातात फलक घेऊन ते लोकांना घाबरवतायत... 'डॉलर द्या अन्यथा ट्रम्प यांना मतदान करु...' असं म्हणतानाही ते दिसले. 

ट्रम्प यांचं व्यक्तीमत्त्व असं आहे की मतदारांमध्ये द्विधा मनःस्थिती बिल्कुल नाही. कुणी त्यांच्या समर्थनार्थ बोलतंय तर कुणी थेट विरोध करतंय. हिलरी क्लिंटन यांच्या निवडणूक प्रचारातील हीच जमेची बाजू ठरणार आहे. ज्यांत ट्रम्प यांच्या तुलनेत हिलरींकडे सर्वात विश्वासार्ह चेहरा म्हणून पाहिलं जातंय.

राजकारणातली नवी शिखरं... 
डोनाल्ड ट्रम्प आपल्या व्यावसायिक साम्राज्यप्रमाणेच राजकारणातहीही नवी शिखरं, यश गाठायचंय... न्यूयॉर्कच्या ट्रम्प टॉवरमध्ये अमेरिकेला एक वेगळा पर्याय देण्याची रणधुमाळी दिसून आली... अमेरिकेसह साऱ्या जगाशी संबधित धोरणांमध्ये बदल आणण्याची लगबग दिसली. 

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा आवाज बनणार की नाही हे कुणीही सांगू शकत नाही. मतदारांच्या सर्वेक्षणातूनही ते स्पष्ट होणार नाही.. एकमात्र नक्की की गेल्या काही आठवड्यात निवडणूक प्रचारातील डेसीबल विधानांमुळे ट्रम्प अशा ठिकाणी उभे आहेत की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या राजकारणाची चर्चा होताच ट्रम्प नक्कीच आठवतील...