सात मुलं जन्माला घातल्याने ७१ लाखांचा दंड

चीनमध्ये लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नवनवीन उपाय योजना आखण्यात येतात, एकापेक्षा जास्त मुलाला जन्म देणे हा चीनमध्ये कायद्यानुसार गुन्हा आहे.

Updated: Oct 12, 2015, 05:22 PM IST
 सात मुलं जन्माला घातल्याने ७१ लाखांचा दंड title=

बिजिंग : चीनमध्ये लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नवनवीन उपाय योजना आखण्यात येतात, एकापेक्षा जास्त मुलाला जन्म देणे हा चीनमध्ये कायद्यानुसार गुन्हा आहे.

मात्र एका परिवारात एका जोडप्याने सात मुलं जन्माला घातली. त्यामुळे या परिवाराला सरकारकडून ७१ लाख रूपयांचा दंड करण्यात आला. यांना चार मुली आणि ३ मुलं आहेत. या परिवाराचं वार्षिक उत्पन्न पाहून हा दंड करण्यात आला आहे. दंड वेळेवर न भरल्यास सरचार्ज लावला जाणार आहे.

बिजिंगपासून जवळ असलेल्या तोंगझू जिल्ह्यात ही व्यक्ती १९८४ पासून परवानगीशिवाय राहते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.