नर्सला छेडल्यावरून डॉक्टरने पेशंटला ठार मारलं

हॉस्पिटलमधील नर्सशी एका रुग्णाने गैरवर्तन केलं. या नर्सने एका डॉक्टरला तो रूग्ण दाखवला. संतापलेल्या धिप्पाड डॉक्टरने त्या रुग्णाला बॉक्सिंग स्टाइल मारलं.

Updated: Jan 10, 2016, 08:41 PM IST
नर्सला छेडल्यावरून डॉक्टरने पेशंटला ठार मारलं title=

मॉस्को : हॉस्पिटलमधील नर्सशी एका रुग्णाने गैरवर्तन केलं. या नर्सने एका डॉक्टरला तो रूग्ण दाखवला. संतापलेल्या धिप्पाड डॉक्टरने त्या रुग्णाला बॉक्सिंग स्टाइल मारलं.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

या मारहाणीत रुग्णाचा मृत्यू झाला. रशियातील बेल्गॉरोड शहरात ही धक्कादायक घटना घडली. 

हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली. इंटरनेटवर डॉक्टरच्या मारहाणीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. लाखो लोकांनी हा व्हिडिओ इंटरनेटवर पाहिला, त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे. डॉक्टरने कायदा हातात घ्यायला नको होता, अशी अनेकांची मतं आहेत.