सोफ्यावर बसून सहा महिन्यापासून प्रेत टीव्ही पाहत होतं

Last Updated: Sunday, March 30, 2014 - 22:28

जर्मनी पोलिसांनी पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना धक्काचं बसला कारण, एक महिला सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होती. या महिलेचा मृत्यू सहा महिन्यांपूर्वीच झाला होता.
स्थानिक मीडियात आलेल्या बातमीनुसार फ्रेंकफर्टजवळ ओबेरूसेल भागातील एका अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर, 66 वर्षाच्या महिलेचं शव मिळालं.
अपार्टमेंटच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा लेटर बॉक्स फूल भरला होता. यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली.
जेव्हा पोलिस दार तो़डून आत दाखल झाले, तेव्हा ही महिला टीव्ही पाहत होती. खरंतर ते महिलेचं प्रेत होतं.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या महिलेचा मृत्यू झाला होता.
जेव्हा ही महिला टीव्ही पाहत होती, तेव्हाच या महिलेचा मृत्यू झाला, आणि अशाच अवस्थेत तिचं प्रेत पडून होतं. या महिलेचा मृत्यू संशयास्पद नसल्याची खात्री पोलिसांनी केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 30, 2014 - 20:29
comments powered by Disqus