एका नागरिकाच्या हत्येसाठी राजकुमाराला शिरच्छेदाची शिक्षा!

एका नागरिकाची गोळी मारून हत्या केल्याप्रकरणी चक्क एका देशाच्या राजकुमारालाच देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Updated: Oct 19, 2016, 06:22 PM IST
एका नागरिकाच्या हत्येसाठी राजकुमाराला शिरच्छेदाची शिक्षा!  title=

रियाध : एका नागरिकाची गोळी मारून हत्या केल्याप्रकरणी चक्क एका देशाच्या राजकुमारालाच देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

सौदी अरबचा राजकुमार प्रिन्स तुर्की बिन सऊद अल कबीर याला मृत्यूदंड ठोठावण्यात आलाय. सौदी अरेबियात तलवारीनं मुंडकं उडवून मृत्यूदंड देण्यात येतो. 

2012 मध्ये झालेल्या एका भांडणादरम्यान अदेल अल माहेमिद नावाच्या एका सौदी नागरिकाची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी या प्रकरणात राजकुमार प्रिन्स तुर्की याला दोषी ठरवण्यात आलं होतं.