सौदीमध्ये ब्लॉगरला फटक्‍यांची शिक्षा

सौदी अरेबियातील रियाधमध्ये एका ब्लॉगरला फटक्यांची शिक्षा देण्यात आली आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून इस्लाम धर्माचा अपमान केल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आली. 

Updated: Jun 10, 2015, 02:35 PM IST
सौदीमध्ये ब्लॉगरला फटक्‍यांची शिक्षा title=

रियाध : सौदी अरेबियातील रियाधमध्ये एका ब्लॉगरला फटक्यांची शिक्षा देण्यात आली आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून इस्लाम धर्माचा अपमान केल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आली. 

सौदी अरेबियातील न्यायालयाने एका ब्लॉगरला चाबकाच्या एक हजार फटक्‍यांसह दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे, तसेच या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या प्रकरणी जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

जानेवारीपासून या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येत होती. जानेवारीमध्ये त्याला ५० फटक्‍यांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या शिक्षेला जगभरातून विरोध झाला होता. तसेच प्रकृतीच्या कारणाने त्याची शिक्षेची अंमलबजावणी थांबविण्यात आली होती. आता जवळपास पाच महिन्यांच्या कालावधीनंतर त्याच्या शिक्षेची पुन्हा एकदा अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सौदी अरेबियातील रिफ बदावी नावाचा ब्लॉगर धार्मिक आणि राजकीय विषयांवर चर्चा करणारे लिबर सौदी नेटवर्क चालवित होता. २०१२ मध्ये इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून धर्माचा अपमान केल्याबद्दल त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने २०१४ मध्ये त्याला चाबकाच्या एक हजार फटक्‍यांसह दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.