शकिराच्या `ला ला ला`ने लावले वेड

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, March 26, 2014 - 13:02

www.24taas.com, वृत्तसंस्था, लॉस एंजेलिस
`वाका वाका` या गाण्यानंतर पॉप स्टार शकिराने पुन्हा एकदा रसिकांना वेड लावले आहे. तिच्या नव्या गाण्याने फेसबुक आणि युट्युबवर धमाल केली आहे.
शकिराने खास नवे गाणे तयार केले आहे. या गाण्याचे बोल `ला ला ला` असे आहेत. ब्राझीलमध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपसाठी तयार केलेलं `ला ला ला` हे थीम साँग सध्या इंटरनेटवर चांगलंचं धूम ठोकत आहे. या गाण्याला फेसबूकवर सर्वाधिक 86.3 मिलियन चाहत्यांनी पसंती दिली आहे.
शकिराच्या गाण्याला वाढता प्रतिसाद पाहता ते जबरदस्त हिट होईल, या शंकाच नाही. चार वर्षांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा शकिराच्या `वाका वाका साऊथ आफ्रिका` हे थीम साँग सर्वाधिक लोकप्रिय झालं होतं. आता त्यापाठोपाठ ला ला ला` हे थीम साँगही सुपर हीट होत आहे. हे थीम साँगही नव-नवे रेकॉर्ड प्रस्थापित करेल अशी शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ
http://zeenews.india.com/marathi/news/video/%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BF%...

First Published: Wednesday, March 26, 2014 - 12:57
comments powered by Disqus