पांढऱ्या शार्कचा जवळून फोटो काढायला गेला अन्...

शार्क माशाला जवळून आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या कॅमेरामनला मोठी किंमत चुकवावी लागलीय. या कॅमेरामनचा जीव वाचला पण, त्याला आपला जवळपास सात लाख किंमतीचा कॅमेरा गमवावा लागलाय. 

Updated: Sep 9, 2014, 05:59 PM IST
पांढऱ्या शार्कचा जवळून फोटो काढायला गेला अन्... title=

वेलिंग्टन : शार्क माशाला जवळून आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या कॅमेरामनला मोठी किंमत चुकवावी लागलीय. या कॅमेरामनचा जीव वाचला पण, त्याला आपला जवळपास सात लाख किंमतीचा कॅमेरा गमवावा लागलाय. 

एमी अॅवॉर्ड विजेता वाइल्ड लाईफ कॅमेरामन अॅन्डी ब्रांन्डी कॉसग्रांदे हा डिस्कवरी चॅनलसाठी एक व्हिडिओ शूट करत होता. अॅन्डी स्वत: एका पिंजऱ्यात बंद होता आणि एका मोठ्या काठिवर लावलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीनं तो एका सफेद शार्क माशाचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होता.

अचानक, त्यानं शार्क आपल्या खूपच जवळ येत असल्याचं पाहिलं... आणि त्याला शार्कला अगदी जवळून शूट करण्याचा मोह आवरता आला नाही. पण, हाच मोह त्याला भारी पडला. कारण, पुढच्याच क्षणी त्याला आपला कॅमेरा भूकेलेल्या शार्कच्या जबड्यात असल्याचं जाणवलं. 

कॅमेऱ्याला वाचवण्यासाठी अॅन्डी काही करणार त्याआधीच शार्कनं तो कॅमेरा च्युईंगमसारखा चाऊन टाकला होता.  

ही घटना न्यूझलंडच्या एका तटाजवळच्या समुद्रात घडलीय. अॅन्डीनं हा कॅमेरा '360 हिरोज' या कंपनीचा सीईओ मायकल किटनर याच्याकडून भाड्यानं घेतला होता. या पूर्ण कॅमेरा किटमध्ये सहा गो-प्रो कॅमेरे लागलेले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.