ही 'हडळ' नाही!

हडळींचे पाय उलटे असल्याची दंतकथा आपण अनेकवेळा ऐकली आहे. पण खरंच उलटे पाय असणारी महिला हडळ असते का? कारण नायजेरियात एक अशी महिला आहे, जिच पाय उलटे आहेत. मात्र ती हडळ नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 15, 2013, 04:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नायजेरिया
हडळींचे पाय उलटे असल्याची दंतकथा आपण अनेकवेळा ऐकली आहे. पण खरंच उलटे पाय असणारी महिला हडळ असते का? कारण नायजेरियात एक अशी महिला आहे, जिच पाय उलटे आहेत. मात्र ती हडळ नाही.
नायजेरियातील वांग फांग नामक महिलेचे पाय जन्मतःच उलटे आहेत. साधारणतः आपल्या पायांचे तळवे आणि बोटं पुढच्या बाजूला असतात. मात्र तिच्या पायांचे तळवे मागच्या बाजूला आहेत. या गोष्टीचा तिला अजिबात त्रास होत नाही. तसंच तिला हडळही कुणी मानत नाही आणि ती ही स्वतःला अपंग समजत नाही.
मात्र उलट्या पावलांमुळे वांग फांग हिच्या चालण्याचा वेग जास्त आहे. तिला चालताना कुठलाही त्रास होत नाही. आपल्याकडे कदाचित अशा व्यक्तीला हडळ मानून वेगळं पाडलं असतं. मात्र वांग फांग आपल्या कुटुंबासोबत रेस्त्राँ चालवते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.