आजचा चंद्र असणार खास

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सगळ्यात मोठा दिसतो. पण आजची म्हणजेच शुक्रवारची पौर्णिमा याला अपवाद आहे.

Updated: Apr 22, 2016, 06:09 PM IST
आजचा चंद्र असणार खास title=

मुंबई: पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सगळ्यात मोठा दिसतो. पण आजची म्हणजेच शुक्रवारची पौर्णिमा याला अपवाद आहे. आज रात्री चंद्र सगळ्यात छोटा असणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या सगळ्यात छोट्या चंद्राला मिनी मून असं म्हणतात. 

आज रात्री 9 वाजून 35 मिनीटांनी चंद्र हा पृथ्वीपासून सगळ्यात जास्त अंतरावर असणार आहे. यावेळी चंद्र पृथ्वीपासून 4,06,350 किमी एवढ्या अंतरावर असेल. इतर दिवशी चंद्र हा पृथ्वीपासून जवळपास 3,84,000 किमी अंतरावर असतो. त्यामुळे आजचा चंद्र पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा 14 टक्के छोटा दिसेल.   

यानंतर 15 वर्षानंतर म्हणजेच 10 डिसेंबर 2030 ला यापेक्षा छोटा चंद्र पाहायचा योग येणार आहे.