आण्विक शस्त्रांस्त्रांमध्ये पाक भारतापेक्षा बलवत्तर

भारताच्या तुलनेत पाकिस्तानाकडे अणुबॉम्बचा साठा जास्त असल्याचं सांगितलं जातंय. एका इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानकडे आण्विक शस्त्रांचाही साठा जास्त असल्याचं स्टॉकहोम स्थित `इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूट`च्या एका अहवालात म्हटलं गेलंय.

Updated: Jun 18, 2014, 02:01 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताच्या तुलनेत पाकिस्तानाकडे अणुबॉम्बचा साठा जास्त असल्याचं सांगितलं जातंय. एका इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानकडे आण्विक शस्त्रांचाही साठा जास्त असल्याचं स्टॉकहोम स्थित `इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूट`च्या एका अहवालात म्हटलं गेलंय.
पाकिस्तानाकडे असलेल्या आण्विक शस्त्रांची संख्या आता 100 ते 120 वर गेलीय. तर भारताकडे 90 ते 110 आण्विक शस्त्रास्त्रे उपलब्ध असल्याचं या अहवालात म्हटलं गेलंय. पण, या दोन्ही देशांपेक्षा चीनकडे अधिक म्हणजे 250 आण्विक शस्त्रास्त्रे असल्याचाही उल्लेख या अहवालात करण्यात आलाय.

रशिया आणि अमेरिका यांसारख्या प्रगत देशांजवळ जवळपास 7-8 हजार शस्त्रास्त्र आहेत. तर संपूर्ण जगभरात 16,300 आण्विक शस्त्र बनवली गेली आहेत. त्यापैंकी 4000 शस्त्रास्त्र वापरण्याच्या स्वरुपातील आहेत.
अहवालात म्हटल्यानुसार, चीन, पाकिस्तान आणि भारत या देशांत आण्विक शस्त्रांचा साठा वाढत चाललाय आणि सोबतच, इस्राइल या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे.

आपल्या आण्विक शस्त्रांना धाडण्यासाठी योग्य प्रणाली विकसित करण्यात हवं तसं यश मिळालं नसल्यानं भारतासमोर अजूनही काही समस्या आहे. त्यामुळेच, भारताकडे समूद्रातून शत्रूवर वार करण्यासाठी किंवा लढण्यासाठी अजूनपर्यंत मिसाईल विकसित झालेली नाही. तसंच दुसऱ्या महासागरापर्यंत पोहचू शकेल अशा ताकदीची मिसाईल ना भारताकडे आहे ना पाकिस्तानकडे...

भारताकडे असलेला सर्वांत शक्तिशाली मिसाईल अग्नि-5 तयार होण्यासाठी अजूनही जवळजवळ तीन वर्ष अवकाश आहे. ही मिसाईल जवळपास 5000 किलोमीटरपर्यंतचं अंतर सहज कापू शकते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.