सर्जिकल स्ट्राईक : भारत आणि पाकिस्तानने काय म्हटलंय?

भारताने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केली. यात भारताने काय झालं ते म्हटलं आणि पाकिस्तानने देखील उलट्या बोंबा सुरू ठेवल्या आहेत. पाहा भारत आणि पाकिस्तान काय म्हणाले...

Updated: Sep 29, 2016, 06:04 PM IST
सर्जिकल स्ट्राईक : भारत आणि पाकिस्तानने काय म्हटलंय? title=

नवी दिल्ली : भारताने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केली. यात भारताने काय झालं ते म्हटलं आणि पाकिस्तानने देखील उलट्या बोंबा सुरू ठेवल्या आहेत. पाहा भारत आणि पाकिस्तान काय म्हणाले...

भारताने म्हटलंय...

नियंत्रण रेषेवर घुसखोरी करण्यासाठी दहशतवादी जमले होते...
भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केलं, अनेक दहशतवादी मारले गेले...
ऑपरेशनचा उद्देश दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा होता..
काही पाकिस्तानींना ताब्यात घेण्यात आलंय...
भारताने या कारवाईची पाकिस्तानला माहिती दिली आहे...

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

भारताने सिमेवर केलेल्या गोळीबाराचं उत्तर देण्यात येईल
कोणतीही सर्जिकल स्ट्राईक झालेली नाही, ते अफवा पसरवतायत
रात्री अडीचपासून सकाळी आठपर्यंत गोळीबार सुरू होता
जर कोणतीही सर्जिकल स्ट्राईक झाली तर उत्तर देऊ
भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे दोन जवान ठार झाले