सीरिया हवाई हल्ल्यात पाच नागरिक ठार

सीरियामध्ये बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या काफ नाब शहरात झालेल्या हवाई हल्ल्यात तीन मुलांसह किमान पाच नागरिक ठार झालेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 9, 2017, 11:43 PM IST
सीरिया हवाई हल्ल्यात पाच नागरिक ठार

मॉस्को : सीरियामध्ये बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या काफ नाब शहरात झालेल्या हवाई हल्ल्यात तीन मुलांसह किमान पाच नागरिक ठार झालेत. 

सीरियातल्या मानवाधिकार संघटनेनं याबाबत माहिती दिलीये. तसंच अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती आहे. 

दरम्यान, टर्कीमध्ये अध्यक्ष ताय्यीप अॅर्डोजेन यांच्या हत्येचा कट करणाऱ्या सैनिकांना फासावर लटकवण्याची मागणी करत शेकडो नागरिकांनी मोर्चा काढला. हातामध्ये फासाचा दोर घेऊन नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदवला.